फक्त कलाकारांनाच नियमांचा जाच का ? – शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा प्रश्‍न

निर्बंध असतांनाही अनेक वेळा होणार्‍या राजकीय कार्यक्रमातील गर्दीकडे कानाडोळा केला जातो; मात्र कलाकारांनी कार्यक्रम सादर करायचे नाहीत, अशी दुटप्पी भूमिका असल्याने कलाकारांना नियमांचा जाच का ?

सातारा येथे लोप्रतिनिधींच्या उपस्थितीत ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण !

सातारा जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगातून विकत घेतलेल्या ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

संभाजीनगर येथे कव्वालीचा कार्यक्रम घेतलेल्या ‘फार्महाऊस’ला जिल्हाधिकार्‍यांनी ठोकले टाळे !

संचारबंदीचे नियम झुगारून कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले खासदार इम्तियाज जलील यांना ही चूकच वाटत नाही, त्यामुळे जनतेला धोक्याच्या खाईत लोटणारे लोकप्रतिनिधी जनतेची सुरक्षा कधीतरी करू शकतील का ?

युरोप, अमेरिका आणि चीन यांच्यामुळे जगाला हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ! – भारत

गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.

२८ मे या दिवशी होणारा स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त मेळावा आणि पुरस्कार सोहळा स्थगित

सावरकर भक्तांनी २८ मे या दिवशी आपल्या घरी सावरकर जयंती साजरी करावी. तसेच स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केल्याची छायाचित्रे किंवा ध्वनिचित्रीकरण ९८२२८ ०१९७३ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत.

ब्राझिलच्या राष्ट्रपतीकडून कोरोना नियमावलीचा भंग केल्याने त्यांना दंड

ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.

चीनमधील वाहिनीवरून इस्रायलविरोधी कार्यक्रम !

चीनची राजधानी बीजिंग येथे असलेल्या इस्रायलच्या दूतावासाने एका चिनी दूरचित्रवाहिनीवर ज्यूविरोधी कार्यक्रम प्रसारित केल्याचा आरोप केला आहे.

‘म्युटेशन’मुळे (विकारामुळे) घाबरून जाण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. शशांक जोशी

पंतप्रधानांची ‘महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्यासमवेत चर्चा !

पुनःश्‍च व्हावे, हिंदवी स्वराज्य ! – शिवप्रेमींनी केली हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा ! – मोहन शेटे सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ शिवजयंती उत्सव पार पडला पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकीय आक्रमकांविरोधातच नव्हे, तर … Read more

‘एक घाटकोपर, एक शिवज्योत’ या व्यापक संकल्पनेतून घाटकोपर (मुंबई) येथे शिवजयंती उत्साहात साजरी !

कोरोनाविषयक शासकीय नियम-अटी यांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.