चीनमधील वाहिनीवरून इस्रायलविरोधी कार्यक्रम !

इस्रायलकडून निषेध !

तेल अवीव – चीनची राजधानी बीजिंग येथे असलेल्या इस्रायलच्या दूतावासाने एका चिनी दूरचित्रवाहिनीवर ज्यूविरोधी कार्यक्रम प्रसारित केल्याचा आरोप केला आहे.

१. दूतावासाने आरोप केला आहे की, सीजीटीएन् या चीन सरकारच्या दूरचित्रवाहिनीने गाझातील एअर स्ट्राइकच्या संदर्भात एक चर्चात्मक कार्यक्रम प्रसारित केला. तो ज्यूविरोधी होता. आम्ही चीनच्या सरकारी दूरचित्रवाहिनीवर ज्यूविरोधी भावना पाहून स्तब्ध झालो आहोत. ‘जगावर ज्यू लोकांचे नियंत्रण आहे’, असा जो खोटा सिद्धांत मांडला गेला जातो, तो काळाच्या पडद्याआड गेला आहे, असे वाटले होते; मात्र या प्रकरणात दुर्दैवाने ज्यूविरोधीने चीनने त्याचा कुरूप तोंडवळा पुन्हा दाखवला आहे.’’

२.  याविषयी चीनकडून सांगण्यात येत आहे की, ३ मिनिटांच्या कार्यक्रमामध्ये नेमके काय आक्षेपार्ह होते, हे बुधवारी सुट्टीचा दिवस असल्याने स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणात चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

३. सीजीटीएन् वाहिनीवर सूत्रसंचालक झेंग जुनफेंग यांनी प्रश्‍न केला होता की, इस्रायलला असलेले अमेरिकेचे समर्थन वास्तवात लोकशाही मूल्यांवर आधारित आहे का ? यावर काही लोकांचे म्हणणे होते की, अमेरिकेचे धोरण ठरवणार्‍यांवर अमेरिकेतील श्रीमंत ज्यू लोक आणि त्यांची लॉबी यांचा विशेष प्रभाव आहे. यामुळेच अमेरिकेचे परराष्ट्र धोरण इस्रायलच्या समर्थनार्थ दिसते.

३. झेंग जुनफेंग यांचे म्हणणे होते की, ज्यू लोक उद्योग-धंदे आणि इंटरनेट यांच्या जगात बलशाली आहेत.

४. झेंग जुनफेंग म्हणाले की, आपला कट्टर प्रतिस्पर्धक चीनला मात देण्यासाठी अमेरिका मध्य-पूर्वेत इस्रायलचा वापर करत आहे. एवढेच नाही, तर अमेरिका अरब देशांना मात देण्यासाठी छुपी मोहीम चालवत आहे.

५. यासंदर्भात, सीजीटीएन् वाहिनी चालवणार्‍या आस्थापनाकडून अद्याप कसल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही. चीनमधील ही वाहिनी अन्य देशांसाठी कार्यक्रमांचे प्रसारण करत असते.