सातारा येथे लोप्रतिनिधींच्या उपस्थितीत ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण !

डावीकडून पाचव्या स्थानावर विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर

सातारा, १७ जुलै (वार्ता.) – सातारा जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगातून विकत घेतलेल्या ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार, विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला.