
मुंबई, २ एप्रिल (वार्ता.) – घाटकोपर येथील भटवाडीमध्ये समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘एक घाटकोपर, एक शिवज्योत’, या व्यापक संकल्पनेतून तिथीनुसार ३१ मार्च या दिवशी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाविषयक शासकीय नियम-अटी यांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमामध्ये प्रारंभी श्री गणेशपूजन आणि शिवज्योतीचेही पूजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींनी शिवनेरी किल्ल्यावरून घाटकोपरपर्यंत दौड करत आणलेली शिवज्योत कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रज्वलित ठेवण्यात आली होती. श्री शिवनेरी गडावर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर ही शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. मुरबाड येथील शिवप्रेमी श्री. उमेश होमने यांनी शिवज्योत आणणार्या शिवप्रेमींचे स्वागत केले.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !