‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांच्या (वेटर्सच्या) गणवेशात भारतीय रेल्वेकडून पालट !

भारतीय रेल्वेने ‘रामायण एक्सप्रेस’ गाडीतील वाढप्यांना (वेटर्सना) साधूंप्रमाणे गणवेश परिधान करण्यासाठी दिला होता. यास संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांनी प्रखर विरोध केल्यानंतर अंततः रेल्वेने हा गणवेश पालटला.

छत्तीसगड येथे १ सहस्र २०० धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्‍यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.

वसई-विरार महानगरपालिकेकडून ३ अवैध मांस विक्रेत्यांची अनुज्ञप्ती रहित !

हिंदू आणि गोप्रेमी यांनी एकजुटीचे काढलेल्या धडक मोर्च्याचे यश !

हिंदूसंघटन हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमात्र उपाय ! – वक्त्यांचा सूर

भारतात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध माध्यमातून हिंदूंना साहाय्य करणे आणि सर्व हिंदूंचे संघटन करणे या उद्देशाने कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ यशस्वीरित्या पार पडले.

‘बदायू’चे पूर्वीचे नाव ‘वेदामऊ’ होते ! – योगी आदित्यनाथ

प्राचीन काळामध्ये ‘बदायू’चे नाव ‘वेदामऊ’ होते. ते वेदांच्या अध्ययनाचे स्थान होते. असेही म्हटले जाते की, गंगानदीला पृथ्वीवर आणणारे महाराजा भगीरथ यांनी येथेच तपस्या केली होती, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

कायद्याप्रमाणे बालसंन्यास योग्यच !

हिंदूंच्या धार्मिक रूढी, परंपरा, चालीरिती, देवतांचे सण, उत्सव, मंदिरातील सहस्रो वर्षांपासूनच्या परंपरा यांचे घटनेच्या कलम १९, २१, २५, २६ प्रमाणे पालन आणि अनुकरण करता येते. त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. माननीय न्यायालयेही अपवाद नाहीत; मात्र हिंदूंनी ‘मला काय त्याचे’, ही वृत्ती सोडून सदैव जागृत रहावे !’

वाळवा (जिल्हा सांगली) येथे हिंदु धर्माभिमान्यांचे देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत यांसाठी जागृती अभियान !

देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत, यांसाठी संघटितपणे प्रयत्न करणार्‍या वाळवा येथील हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! इतरच्या हिंदूंनी हा आदर्श घेऊन हिंदु धर्मजागृतीच्या कार्यात पुढाकार घ्यावा !

श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती कॅनडा येथून भारतात परत आणण्यात यश !

अद्यापपर्यंत ४२ मूर्ती भारतात आणण्यात मोदी सरकारचे यश !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला !

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत होत असल्यामुळेच हिंदुद्वेष्ट्यांच्या पोटात दुखत आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी धर्मरक्षणाचे कार्य वैध मार्गाने अधिक जोमाने करणे आवश्यक आहे !

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? याचाच अर्थ प्रशासनाला अवैध बांधकामावर कारवाई करण्याची इच्छा नाही. अशा भ्रष्ट आणि कामचुकार प्रशासनावरच प्रथम कारवाई करायला हवी !