संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांच्या संघटित विरोधाचा परिणाम !
नवी देहली – भारतीय रेल्वेने ‘रामायण एक्सप्रेस’ गाडीतील वाढप्यांना (वेटर्सना) साधूंप्रमाणे गणवेश परिधान करण्यासाठी दिला होता. यास संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांनी प्रखर विरोध केल्यानंतर अंततः रेल्वेने हा गणवेश पालटला. रेल्वेने म्हटले आहे की, ‘रामायण एक्स्प्रेस’मधील कर्मचार्यांचा गणवेश पूर्णपणे पालटण्यात आला आहे. आता हे कर्मचारी व्यावसायिक कपड्यांमध्ये दिसणार आहेत. लोकांना झालेल्या असुविधेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो.
Dress of Ramayan Express staff changed after seers’ protest https://t.co/BR9LxZtSSm pic.twitter.com/BstWEC5Evt
— The Times Of India (@timesofindia) November 23, 2021
‘रेल्वेने जर कर्मचार्यांचा गणवेश पालटला नाही, तर १२ डिसेंबर या दिवशी ‘रामायण एक्स्प्रेस’ गाडी देहली येथे रोखली जाईल’, अशी चेतावणी संत समाजाने दिली होती. सनातनचे खेड (रत्नागिरी) येथील साधक डॉ. अशोक शिंदे यांनीही आय.आर्.सी.टी.सी.च्या मुख्य व्यवस्थापकांना याविषयी पत्र लिहून आक्षेप घेतला होता. त्यावर ‘हा गणवेश पालटण्यात येईल’, असे उत्तर रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याकडून त्यांना देण्यात आले होते.