‘बदायू’चे पूर्वीचे नाव ‘वेदामऊ’ होते ! – योगी आदित्यनाथ

बदायू (उत्तरप्रदेश) – प्राचीन काळामध्ये ‘बदायू’चे नाव ‘वेदामऊ’ होते. ते वेदांच्या अध्ययनाचे स्थान होते. असेही म्हटले जाते की, गंगानदीला पृथ्वीवर आणणारे महाराजा भगीरथ यांनी येथेच तपस्या केली होती, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विधानानंतर बदायूचे नाव पालटून आता वेदामऊ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी राज्यातील अनेक शहरे आणि जिल्हे यांना मोगलांनी दिलेली नावे पालटण्यात आली आहेत.