वसई-विरार महानगरपालिकेकडून ३ अवैध मांस विक्रेत्यांची अनुज्ञप्ती रहित !

हिंदू आणि गोप्रेमी यांनी एकजुटीचे काढलेल्या धडक मोर्च्याचे यश !

गोप्रेमींनो, केवळ या यशावर न थांबता सर्वत्र होणार्‍या गोहत्या रोखण्यासाठी प्रयत्नरत रहा ! – संपादक

मुंबई – वसई, विरार आणि पालघर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोहत्यांच्या विरोधात १२ नोव्हेंबर या दिवशी गोप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी शेकडोंच्या संख्येने वसई-विरार महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला होता. मोर्च्यानंतर पालिका प्रशासनाने अवैध मांसविक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगून अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी १ मासाचा अवधी मागितला होता. ‘दिलेल्या कालावधीत कारवाई न केल्यास प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढू’, अशी चेतावणीही हिंदुत्वनिष्ठांनी दिली होती. त्यानुसार

१२ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी महानगरपालिकेने अवैध मांसविक्री केल्याच्या प्रकरणी ३ जणांची अनुज्ञप्ती (परवाने) रहित केली आहे.