पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ‘काशी विश्‍वनाथ धाम’चे लोकार्पण उद्या, १३ डिसेंबर या दिवशी दीपप्रज्वलन करून होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काशीमध्ये १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत घरोघरी दीप लावले जात आहेत.

हिंदु राष्ट्र दूर नाही !

आसाममधील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे  (‘ए.आय.यू.डी.एफ्.’चे) आमदार अमिनुल इस्लाम यांनी ‘औरंगजेबाने अनेक मंदिरांना भूमी दान केली होती. तसेच अन्य मोगल शासकांनीही मंदिरे आणि पुजारी यांच्यासाठी भूमी दान केली होती.

हिंदूंनी महादेव मंदिरात आरतीसाठी प्रत्येक सोमवारी उपस्थित रहावे !

हिंदूंचे संघटन होण्याच्या दृष्टीने त्यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७ वाजता आरतीसाठी उपस्थित रहावे. असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ श्री. राहुल कदम आणि श्री. रविराज चौगुले यांनी केले आहे.

‘शारदा वाचवा समिती’कडून पाकव्याप्त काश्मीरमधील ‘शारदा यात्रा’ पुन्हा आरंभ करण्याचा प्रयत्न

मुळात सरकारनेच यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील उखडलेले शिवलिंग आणि त्रिशूळ हिंदूंनी पुन्हा स्थापित केले !

आसाममधील कछार जिल्ह्यातील कटीगोरामधील महादेव टिला येथील शिवलिंग आणि त्रिशूळ ख्रिस्त्यांकडून उखडण्यात आले होते. तसेच त्यांनी येथील वडाचे विशाल झाडही कापले होते.

‘श्रीशैलम् भ्रमराम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिरा’च्या परिसरात अन्य धर्मियांना दुकाने लावता येणार नाहीत !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव असणे, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.

उत्तराखंड सरकारकडून अखेर चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण रहित !

आता संपूर्ण देशातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या विरोधात संपूर्ण देशातील पुजारी, धार्मिक संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे अन् देशातील प्रत्येक मंदिर सरकारीकरणमुक्त केले पाहिजे !

आगरा येथील ‘मुगल रोड’चे ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ असे नामांतर !

स्थानिकांनी मागणी कशाला करायला हवी होती ? प्रशासनाला हे कळत नव्हते का ?

उत्तरप्रदेशात महापुरुषांची जयंती आणि महाशिवरात्री यांदिवशी पशुवधगृहे अन् मांसविक्री यांवर बंदी

देशातील सर्वच राज्यांत असा नियम केला पाहिजे !

उत्तरप्रदेशचे विधी आणि न्याय मंत्र्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ‘हलाल’ प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करण्यासाठी पत्र

हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली होती मागणी