तेलंगाणा राष्ट्र समितीच्या नेत्याकडून २०० कोंबड्या आणि मद्याच्या बाटल्या यांचे वाटप !

आज दसर्‍याच्या मुहूर्तावर तेलंगाणा राष्ट्र समितीकडून होणार राष्ट्रीय पक्षाची घोषणा !

गोव्यात १ ऑक्टोबरपासून पाणीदेयकात ५ टक्के वाढ

सर्व प्रकारच्या पाणीदेयकांत ही वाढ होणार असून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणीदेयकात वाढ होणार आहे. आता केलेल्या दरवाढीमुळे सध्याच्या वाढत्या महागाईत नागरिकांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

सांस्कृतिक प्रसाराचे सूर !

एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !

गुलाम नबी आझाद यांच्याकडून ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ नावाच्या नव्या पक्षाची घोषणा

आझाद म्हणाले नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी या पक्षाचा प्रारंभ करत आहे. पक्षाचा स्वतःचा विचार असेल, त्यावर कुणाचाही प्रभाव असणार नाही.

पाकच्या महिला मंत्र्याच्या विरोधात लंडनच्या रस्त्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून ‘चोर चोर’ म्हणत घोषणाबाजी

पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना येथे पाकिस्तानी नागरिकांकडून विरोध करण्यात आला. येथील एका कॉफी शॉपमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या.

मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची अनुमती नाकारली !

कोणत्याही एका अर्जदारास अनुमती दिल्यास या संवेदनशील परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे अनुमती नाकारण्यात आली.

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.

लोकप्रतिनिधी कायद्यात अनेक सुधारणा करण्याची निवडणूक आयोगाची केंद्रशासनाला शिफारस

राजकीय पक्षांच्या देणग्यांची मर्यादा निश्‍चिती करण्याचा प्रयत्न

पहाटे ६ वाजेपर्यंत काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांना खड्डे दिसत नाहीत का ?

सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाही का ? असा प्रश्न खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केला.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह भाजपमध्ये करणार प्रवेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे १९ सप्टेंबर या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी नुकताच स्थापन केलेला राजकीय पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’चे प्रवक्ते प्रीतपाल सिंह बालियावाल यांनी केली.