गोव्यात राजकीय भूकंप : काँग्रेसचे ८ आमदार भाजपमध्ये !

गोव्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भ्रष्टाचाराची विविध रूपे !

नैतिक समाज स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि ‘भ्रष्टाचार होणार नाही’, यासाठी सजग असेल. व्यक्तीच जर मुळात नैतिक असेल, तर ती भ्रष्टाचारही करणार नाही आणि योग्य तो करही प्रामाणिकपणे भरेल. त्यामुळे खर्‍या अर्थाने राष्ट्र संपन्न होईल !

पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघड !

मुंबई आणि गुजरात येथे काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा २ सहस्र कोटींहून अधिक असू शकतो. कर्णावतीसह गुजरातमध्ये करचोरीसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत.

राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

राज्यघटनेचा संदर्भ देत रिझवी यांनी ‘धर्माच्या आधारे मतदारांना आकर्षित करणे अवैध आहे’, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकादाराच्या वतीने अधिवक्ता गौरव भाटिया यांनी न्यायालयात बाजू मांडली.

सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिंदे गट

सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्षे लागण्याची शक्यता नाही. सरकार कोसळेल याची काही जण वाट पहात होते; पण यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले आहे.

भाजप ‘आप’चे ४० आमदार फोडण्याच्या प्रयत्नात !  – ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांचा आरोप

या संदर्भात आपने सर्व आमदारांची बैठक बोलावली होती; मात्र बैठकीपूर्वी पक्षाचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नव्हता.

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची आमदारकी रहित करण्याचे निवडणूक आयोगाचे राज्यपालांना पत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन  यांचे विधानसभेचे सदसत्व रहित करा, असे पत्र झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना पाठवले आहे. सकाळीच हे पत्र राज्यपालांकडे पोचले आहे.

विधान परिषदेत मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून एकनाथ खडसे आणि प्रवीण दरेकर यांच्यात खडाजंगी !

२४ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संबंधित विभागांचे मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. याविषयीचे सूत्र उपस्थित करत सदस्य एकनाथ खडसे यांनी सत्ताधार्‍यांना याचा जाब विचारला.

डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव

ज्यांच्या मागणीमुळे विधीमंडळाच्या कामकाजाच्या  प्रारंभी ‘वंदे मातरम्’चे गायन करण्याचा निर्णय पारित करण्यात आला, असे विधीमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेतून विरोधी पक्षनेत्याचा सभात्याग !

विधान परिषदेमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी लक्षवेधीवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभात्याग केला.