तेलंगाणा राष्ट्र समितीच्या नेत्याकडून २०० कोंबड्या आणि मद्याच्या बाटल्या यांचे वाटप !

आज दसर्‍याच्या मुहूर्तावर तेलंगाणा राष्ट्र समितीकडून होणार राष्ट्रीय पक्षाची घोषणा !

वारंगळ (तेलंगाणा) – तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव दसर्‍याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर वारंगळमध्ये या पक्षाचे नेते राजनला श्रीहरि कामगारांना कोंबड्या आणि मद्य वाटत असल्याचे दिसून आले. त्यांनी २०० कामगारांमध्ये त्याचे वाटप केले.

संपादकीय भूमिका

जनतेला अशा प्रकारच्या तमोगुणी गोष्टी आतापर्यंत लपूनछपून वाटल्या जात होत्या. आता ते उघडपणे वाटले जात आहे, हे लोकशाहीला धोकादायकच होय !