केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे

संजय राऊत यांच्या जामिनाच्या वेळी न्यायालयाने अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ! –  खासदार संजय राऊत, शिवसेना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार चालत आहे. कारागृहातील समस्यांविषयी मी त्यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्यासमवेत काय झाले, हे त्यांना सांगीन, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.

गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षच भाजपला हरवू शकतो ! – माजी पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा

वंजारा यांनी स्थापन केला ‘प्रजा विजय पक्ष’ !

पंतप्रधान मोदी यांच्याकडून इस्रायलचे नवनियुक्त पंतप्रधान नेतान्याहू यांचे अभिनंदन

इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले ७३ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणार आहेत. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतान्याहू यांचे अभिनंदन केले आहे.

साम्यवादी विचारसरणीचे लुला डा सिल्वा ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष

लुला डा सिल्वा हे साम्यवादी विचारसरणीचे नेते ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत डा सिल्वा यांनी उजव्या विचारसरणीचे असलेले मावळते राष्ट्राध्यक्ष जेअर बोलसोनारो यांना पराभूत केले.

अमेरिकेत एका दशकात झाल्या ४५० राजकीय हत्या

भारताला आणि अन्य विकसनशील देशांना उपदेशांचे डोस पाजणार्‍या अमेरिकेत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हेच यातून लक्षात येते !

‘ऋषी’राज !

ब्रिटनमध्ये आज जी अत्यंत बिकट आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे, ती सावरण्यासाठी एक भारतीय वंशाची ‘ऋषी’ नाव असलेली व्यक्ती सज्ज झाली आहे, हा केवळ योगायोग नव्हे, तर ही कालगती आहे. भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांचा पंतप्रधान हिंदु वंशीय होणे, ही कालगतीच !

लिज ट्रस पायउतार !

गेल्याच मासात भारताच्या अर्थव्यवस्थेने ब्रिटनसारख्या अर्थसंपन्न राष्ट्राला जागतिक क्रमवारीत मागे टाकले आहे. भारतीय वंशाचे सुनक पंतप्रधानपदी निवडून आल्यास भारताचा स्वाभिमान जागृत होईल; मात्र ब्रिटिशांचा दुखावेल. असे असले तरी ‘भारतियांविना ब्रिटनला गत्यंतर नाही’ हे ब्रिटिशांना उमजेल तो सुदिन !

इटलीतील निकालांचा अन्वयार्थ : युरोपमधील अतीउजव्या विचारांचे वादळ हे जगासाठी धोक्याची घंटा !

इटलीमध्ये मुसोलिनीच्या विचारांवर आधारित पक्ष सत्तास्थानी आल्यामुळे जगाची चिंता वाढणे

शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवले !

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र ‘शेअर’ करत ‘जिंकून दाखवणारच !’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.