पहाटे ६ वाजेपर्यंत काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांना खड्डे दिसत नाहीत का ?

खासदार राजन विचारे यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे

ठाणे, १८ सप्टेंबर (वार्ता.) – सकाळी ६ वाजेपर्यंत काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नाही का ? असा प्रश्न खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केला. कोपरी पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पहाणी करण्यासाठी गेले असता त्यांनी वरील उद्गार काढले. सध्या पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ठाणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे न बुजवल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असून नागरिकांना शारीरिक त्रासही होत आहेत.