श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ असे त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव ठेवले आहे.
गुलाम नबी यांनी केली नव्या पक्षाची घोषणा: उर्दू-संस्कृतच्या 1500 नावांमधून निवडले डेमोक्रॅटिक आझाद पार्टी नाव#GhulamNabiAzad #NewParty #AzadParty #UrduSanskrit https://t.co/MoU1GOtWao
— Divya Marathi (@MarathiDivya) September 26, 2022
आझाद म्हणाले की, मला आधीच माझ्या पक्षाची घोषणा करायची होती; पण नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी या पक्षाचा प्रारंभ करत आहे. पक्षाचा स्वतःचा विचार असेल, त्यावर कुणाचाही प्रभाव असणार नाही. ‘आझाद’ म्हणजे ‘स्वतंत्र.’ आमच्या पक्षाच्या घटनेत पूर्ण लोकशाहीच्या आधारे तरतूद असेल. पक्षामध्ये वयाचे बंधन असणार नाही. तरुण आणि वरिष्ठ नेते-कार्यकर्ते अशा दोघांना पक्षात समान संधी असणार आहे.