पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह भाजपमध्ये करणार प्रवेश

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह

नवी देहली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे १९ सप्टेंबर या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी नुकताच स्थापन केलेला राजकीय पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’चे प्रवक्ते प्रीतपाल सिंह बालियावाल यांनी केली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा पक्षही ते भाजपमध्ये समाविष्ट करतील. सिंह याआधी काँग्रेसचे पंजाबमधील चेहरा होते. काही मासांपूर्वी त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला होता.