मणीपूरप्रकरणी संसदेत गदारोळ चालूच !

गेली काही दशके संसदेत गदारोळाविना काहीच घडत नाही, असे चित्र देश आणि जग पहात आहे. जर हे असेच चालू रहाणार असेल, तर संसद भरवण्याचा फार्स तरी का केला जात आहे ?, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?

नव्या संसद भवनातील ‘अखंड भारत’च्या मानचित्राचे भारतियांकडून स्वागत !

अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.

(म्‍हणे) ‘आपण पुन्‍हा देशाला काही वर्षे मागे नेतो का ?, अशी चिंता वाटते !’ – शरद पवार

संसद भवनाच्‍या स्‍थळी हिंदु धर्मानुसार शास्‍त्रोक्‍त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्‍यामुळे ते आता विज्ञानवादाच्‍या गप्‍पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत  !

राजदंडाचा सन्मान !

धर्मपरायण, निष्पक्ष, कर्तव्यदक्ष राजा आणि नीतीमान अन् राष्ट्र-धर्माभिमानी प्रजाच राजदंडाचे महत्त्व वाढवतील !

संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली.

राष्ट्रीय जनता दलाने शवपेटीशी केली नवीन संसद भवनाची तुलना !

विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !

वीर सावरकर यांचा त्याग, साहस आणि संकल्प शक्ती यांची गाथा आजही प्रेरणा देते ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

२८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी उपस्थित होते. या वेळी खासदारांनीही पुष्प वाहिले.

जंतरमंतरवर आंदोलन करणार्‍या कुस्तीपटूंचा नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

गेल्या मासाभरापासून काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन चालू केले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याने त्यांनी २८ मे या दिवशी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो हाणून पाडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून ती ४ मजली आहे. याचे क्षेत्रफळ ६४ सहस्र ५०० वर्ग मीटर इतके आहे. या संसद भवनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी या प्रवेशद्वारांची नावे आहेत.

…गांधीवादाचा अस्त ?

देशाच्या संसदेच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे २०२३ या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे हा उद्घाटन सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे. हा निश्चितच योगायोग नाही.