Democratic Polity : संसद आणि विधीमंंडळे या लोकशाहीच्या मंदिरांचे पावित्र्यभंग होत आहे ! – जगदीप धनखड, उपराष्ट्रपती
सध्या आपली संसद आणि विधीमंडळे यांचे कामकाज सुरळीत होत नाही, हे उघड आहे. या सर्व ठिकाणी चाललेल्या कामकाजात रणनीती आखून व्यत्यय आणणे आणि तेथे अशांतता पसरवून एकप्रकारे लोकशाहीच्या मंदिरांचे पावित्र्यभंग केले जात आहे.