खलिस्तानी आतंकवादी पन्नूची घोषणा !
नवी देहली – संसदेबाहेर आणि लोकसभेत घुसून रंगीत धूर सोडल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींना १० लाख रुपयांचे कायदेशीर साहाय्य करण्याची घोषणा ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने केली. विशेष म्हणजे पन्नू याने ५ डिसेंबर या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित करून १३ डिसेंबर २०२३ या दिवशी भारताच्या संसदेवरील आक्रमणाच्या स्मृतीदिनी पुन्हा आक्रमण करण्यात येईल, अशी धमकी दिली होती.
संपादकीय भूमिकाभारताच्या संसदेवर आक्रमण करण्याची धमकी देणारा आणि आक्रमण करणार्यांना अर्थसाहाय्य करण्याची घोषणा करणार्या अमेरिकेचा नागरिक असणार्या खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्यावर आता अमेरिका काय कारवाई करणार ? हे तिने सांगितले पाहिजे. तसेच त्याच्यावर कारवाई होण्यासाठी भारतानेही अमेरिकेवर दबाव आणणे आवश्यक आहे ! |