खासदारांनी घेतला जुन्या संसदेचा निरोप !

जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनामध्ये जाण्यापूर्वी सर्व खासदारांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकत्र येऊन निरोप घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खासदारांना संसद भवनाच्या नव्या इमारतीत घेऊन गेले.

पंतप्रधान १७ सप्टेंबरला नवीन संसदेवर राष्ट्रध्वज फडकावणार !

१७ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकावतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आणि विश्‍वकर्मा जयंतीही आहे.

सदस्यांच्या वागण्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवण्यास नकार ! – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

अशा निर्णयामुळे गदारोळ घालणार्‍या सदस्यांवर काहीही परिणाम होणार नाही. याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात गदारोळ करणार्‍या सदस्यांना संसदेबाहेर काढण्याचे, निलंबित करण्याचे आदी निर्णय घेणे अपेक्षित आहे.

संसदेत अविश्‍वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून चर्चा

मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत १ ऑगस्ट या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

विरोधकांचा केंद्र सरकारविरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला !

मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये २६ जुलै या दिवशीही केंद्र सरकारवर टीका करत मोदी सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारून ‘चर्चेचा दिनांक नंतर निश्‍चित केला जाईल’, असे सांगितले.

मणीपूरप्रकरणी संसदेत गदारोळ चालूच !

गेली काही दशके संसदेत गदारोळाविना काहीच घडत नाही, असे चित्र देश आणि जग पहात आहे. जर हे असेच चालू रहाणार असेल, तर संसद भरवण्याचा फार्स तरी का केला जात आहे ?, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?

नव्या संसद भवनातील ‘अखंड भारत’च्या मानचित्राचे भारतियांकडून स्वागत !

अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.

(म्‍हणे) ‘आपण पुन्‍हा देशाला काही वर्षे मागे नेतो का ?, अशी चिंता वाटते !’ – शरद पवार

संसद भवनाच्‍या स्‍थळी हिंदु धर्मानुसार शास्‍त्रोक्‍त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्‍यामुळे ते आता विज्ञानवादाच्‍या गप्‍पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत  !

राजदंडाचा सन्मान !

धर्मपरायण, निष्पक्ष, कर्तव्यदक्ष राजा आणि नीतीमान अन् राष्ट्र-धर्माभिमानी प्रजाच राजदंडाचे महत्त्व वाढवतील !

संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली.