श्री विठ्ठलाच्या दर्शनरांगेत सुरक्षारक्षकाकडून भाविकाला धक्काबुक्की !

मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्यात तक्रारी होत असल्याचे प्रकार घडत आहेत

पंढरपूर वारीला ‘जागतिक वारसा’ नामांकन देण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागाला सादर !

पुरातत्व विभाग याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करणार आहे. हा प्रस्ताव सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाकडून पुरातत्व विभागाला ८ लाख ८५ सहस्र रुपये निधी देण्यात आला आहे.

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना ! – मोनिका सिंह ठाकूर, अपर जिल्हाधिकारी

यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ घंटे कार्यरत रहाणार आहे. भाविकांना अडचण आल्यास १८००-२३३-१२४० या ‘टोल फ्री’ क्रमांकावर, तसेच ०२१८६ – २२०२४० आणि २९९२४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर पायी चालणार !

शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यामध्ये वाखरी ते पंढरपूर असे ५ किलोमीटर अंतर चालणार आहेत.

प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आषाढ शुक्ल एकादशी सोहळा १७ जुलै या दिवशी होणार असून या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येथे येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे २४ घंटे दर्शन चालू !

प्रतिवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्री विठ्ठलाचा पलंग काढून भाविकांना २४ घंटे दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.

आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात मांस आणि मटण विक्रीस बंदी !

केवळ यात्रा कालावधीतच नको, तर पंढरपूरसह महाराष्ट्रातील सर्वच तीर्थक्षेत्रे आणि देवस्थाने यांच्या परिसरात अशी बंदी कायमस्वरूपी हवी !

पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना आवश्यक सुविधा देण्यासमवेतच स्वच्छतेला प्राधान्य द्या ! – चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलैला होत असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळा, तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासमवेत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक येतात.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील लाकडी मेघडंबरीला चांदीने मढवले !

श्री विठ्ठल गाभार्‍यातील मेघडंबरीसाठी १३५ किलो, तर श्री रुक्मिणीमातेच्या मेघडंबरीसाठी ९० किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे.

आषाढी यात्रेच्‍या निमित्ताने मध्‍य रेल्‍वेच्‍या पंढरपूरसाठी १३५ रेल्‍वेगाड्या !

वारकर्‍यांच्‍या सोयीसाठी मध्‍य रेल्‍वेच्‍या वतीने सोलापूर, नागपूर, भुसावळ विभागांतून १३५ अधिकच्‍या रेल्‍वेगाड्या सोडण्‍यात येणार आहेत. गतवर्षी मध्‍य रेल्‍वेने १०० रेल्‍वेगाड्या सोडल्‍या होत्‍या.