१ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठलदर्शन आणि पूजानोंदणी ‘ऑनलाईन’ पद्धतीने !

पंढरपूर – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे आणि श्री रुक्मिणीमातेचे दर्शन, नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदन उटी पूजा अशा सर्व पूजांची नोंदणी आता १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

सध्या यातील बहुतांश पूजांची नोंदणी प्रत्यक्ष पंढरपूर येथे जाऊन करावी लागते. या पूजांची नोंदणी होतांना त्यात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी समितीकडे केल्या होत्या. यामुळे आता भाविकांना घरी बसून या पूजांची नोंदणी करणे शक्य होणार आहे. www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून याची नोंदणी करता येणार आहे. तरी राज्यभरातील भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन मंदिरे समितीकडून करण्यात आले आहे.