कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांचे गर्वहरण आवश्‍यक !

कॅनडाने खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पोसले, तर हेच खलिस्‍तानी उद्या कॅनडा देश कह्यात घेण्‍यास मागे पुढे पहाणार नाहीत. त्‍यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, पाकिस्‍तानसारखी कॅनडाची दुर्देशा होऊ नये यासाठी कॅनडाने बोध घेऊन खलिस्‍तानी आतंकवाद्यांना थारा देऊ नये.

कॅनडामध्ये भारतियांमुळे अर्थव्यवस्थेला मिळतात ३ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे !

खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचे सध्या थांबवले आहे. या निर्णयामुळे कॅनडातील अर्थतज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेच्या प्रसारणाच्या वेळी दाखवण्यात आले भारताचे चुकीचे मानचित्र !

ग्रेटर नोएडा येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेचे थेट प्रसारण करतांना भारताचे चुकीचे मानचित्र दाखवण्यात आले. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवण्यात आला नाही.

छत्तीसगडचे भाजपचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधातील गुन्हा रहित करा !

छत्तीसगड उच्च न्यायालयाने राज्याचे माजी मुख्मंत्री आणि भाजपचे नेते रमण सिंह, तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधात नोंद केलेला गुन्हा रहित करण्याचा आदेश दिला.

मुंबईत लोकलमध्ये अश्‍लील नृत्‍य करणार्‍या तरुणीच्‍या व्‍हिडिओवर मुंबईकर संतापले

लोकलमध्ये एका तरुणीचा ‘बेली डान्‍स’ नावाचा अश्‍लील नृत्‍यप्रकार करतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित होत आहे. प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी तरुण-तरुणी अशा प्रकारच्‍या गोष्‍टी हल्ली मोठ्या प्रमाणात करतात; परंतु या व्‍हिडिओवर मुंबईकरांनी जोरदार संतप्‍त प्रतिक्रिया दिल्‍या आहेत.

(म्हणे) ‘रशियाने शांतता निर्माण करून युक्रेनशी संवाद साधावा !’ – जस्टिन ट्रुडो

स्वत:च्या देशात सत्ता आणि अधिकार हाताशी असतांना तेथील हिंदूंची मंदिरे आणि उच्चायुक्तालय यांवरील आक्रमणे रोखून शांतता प्रस्थापित करू न शकणारे ट्रुडो दुसर्‍या देशाला कोणत्या तोंडाने उपदेश करतात ?

इराणमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास

इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणार्‍या आणि त्यांना पाठिंबा दर्शवणार्‍या महिलांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संमत केले.

भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा थांबवली !

कॅनडात झालेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात चालू झालेल्या वादातून आता भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याचे तात्पुरते थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे.

(म्हणे) ‘भारताच्या राजदूतांची हकालपट्टी करा, रा.स्व संघावर बंदी घाला !’ – कॅनडातील मुसलमान संघटना

अशा प्रकारच्या मागण्या करून कॅनडातील मुसलमान संघटना भारतद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहे !

खलिस्तानचे समर्थन करणारा गायक शुभनीत सिंह याच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व ‘बोट’ आस्थापनाने काढले !

बोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील !