नवी देहली – कॅनडास्थित पंजाबी गायक शुभनीत सिंह याने खलिस्तानच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांतून पोस्ट प्रसारित केल्यानंतर त्यांचा विरोध केला जात आहे. या पोस्टमध्ये त्याने जम्मू-काश्मीर आणि पंजाब यांना वगळून भारताचे मानचित्र दाखवले होते. प्रसिद्ध आस्थापन ‘बोट’ने त्याच्या भारतातील आगामी कार्यक्रमासाठी दिलेले प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बोट’ने ट्वीट करून म्हटले की, काहीही झाले, तरी आधी आम्ही एक भारतीय आस्थापन आहोत आणि भारताच्या विरुद्ध गोष्टींना समर्थन देणार नाही.’ दुसरीकडे भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यानेही या प्रकरणानंतर ‘इंस्टाग्राम’वरून शुभनीत याला ‘अनफॉलो’ (समर्थकांच्या सूचीतून बाहेर पडणे) केले आहे.
#boat withdraws sponsorship for Canadian Singer’s India Tour over Khalistan remark, here’s what company saidhttps://t.co/XlVWDYNNYd
— Gadgets Now (@gadgetsnow) September 20, 2023
संपादकीय भूमिकाबोट आस्थापनाचे अभिनंदन ! खलिस्तान्यांवर आता देशभरातून बहिष्कार घालण्यास प्रारंभ झाल्यावर ते ताळ्यावर येतील ! |