ख्रिस्ती नववर्षारंभाच्या निमित्त किल्ले आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखावेत ! – हिंदु जनजागृती समिती

‘ओमिक्रॉन’ नावाच्या नव्या ‘व्हेरीएंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे.त्यामुळे ख्रिसमस आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्त होणार्‍या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान-धूम्रपान अन् मेजवान्या करण्यावर प्रतिबंध आणावा.

सिंधुदुर्ग विमानतळावर आलेल्या ९६ प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोनाबाधित

नव्याने संसर्ग होत असलेल्या ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.

दोन डोस असल्याविना शिधावाटप केंद्रात धान्य मिळणार नाही !

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास संबंधितांचे शिधावाटप केंद्रातील धान्य बंद करण्यासमवेतच महापालिका, सेतू कार्यालय, झोन कार्यालय, बीग बझार, डी-मार्ट आणि सरकारी कार्यालय येथे प्रवेशबंदी करण्यात येईल.

ब्रिटनमध्ये ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’ची लस ‘ओमिक्रॉन’वर प्रभावहीन !

भारतात ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’हीच लस ‘कोव्हिशिल्ड’ म्हणून मिळते !

‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची शक्यता असलेल्या सर्व ५ विदेशी नागरिकांची प्रकृती स्थिर !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

 ‘कोरोना’चा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची शक्यता असलेल्या सर्व ५ विदेशी नागरिकांची प्रकृती सध्या स्थिर आहे,..

ओमिक्रॉन विषाणूला नागरिकांनी घाबरू नये ! – बाळासाहेब पाटील, पालकमंत्री, सातारा

पाटील पुढे म्हणाले, ‘‘कोरोना अल्प झाला असला, तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी. विदेशातून येणार्‍या नागरिकांची माहिती केंद्रशासन राज्यशासनाला देत आहे.

ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे घाबरून जाऊ नका ! – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आवाहन

कोरोना प्रतिबंधात्मक लस, मास्क आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासियांना केले आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे ‘ओमिक्रॉन’ विषाणू बाधित ७ रुग्ण आढळले

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ या विषाणूने बाधित ७ रुग्ण पिंपरी चिंचवड, तसेच पुणे येथे आढळले आहेत. यात पिंपरी चिंचवड येथे नायजेरिया येथून आलेली महिला व फिनलँड येथून पुण्यात आलेल्या एका रुग्णाला बाधा झाली आहे.

परराज्यातून येणार्‍यांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘केंद्र आणि राज्य सरकारांच्या नियमावलीतील तफावत दूर केली आहे. केंद्र शासनासमवेत चर्चा करूनच आता नवीन नियमावली येईल. ‘ओमिक्रॉन’विषयी आपण अधिक काळजी घ्यायला हवी.