पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे ‘ओमिक्रॉन’ विषाणू बाधित ७ रुग्ण आढळले

पुणे – कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ या विषाणूने बाधित ७ रुग्ण पिंपरी चिंचवड, तसेच पुणे येथे आढळले आहेत. यात पिंपरी चिंचवड येथे नोव्हेंबरमध्ये नायजेरिया येथून आलेली महिला आणि तिच्या २ मुली, तसेच तिचा भाऊ आणि त्याच्या २ मुली या ६ जणांना ‘ओमिक्रॉन’ विषाणूची बाधा झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यासह फिनलँड येथून नोव्हेंबरमध्ये पुण्यात आलेल्या एका रुग्णाला ‘ओमिक्रॉन’ची बाधा झाली आहे.