ब्रिटनमध्ये ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’ची लस ‘ओमिक्रॉन’वर प्रभावहीन !

भारतात ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’हीच लस ‘कोव्हिशिल्ड’ म्हणून मिळते !

लंडनमधील नागरिक लसीकरणासाठी रांग लावताना

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये ‘ऑक्सफर्ड’ आस्थापनाची ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’ ही लस कोरोनाचा नवा प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या विरोधात प्रभावहीन ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये नागरिक वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेण्यासाठी आता धडपडत आहेत. हा डोस ओमिक्रॉनच्या विरोधात ७६ टक्के लाभदायक ठरत असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. ‘अ‍ॅस्ट्रेजेनेका’ हीच लस भारतात ’कोव्हिशिल्ड’ या नावाने दिली जाते.