पालथ्या घड्यावर पाणी !

आपल्या सरकारी यंत्रणांना बहुधा मागील प्रसंगातून शिकणे ठाऊकच नाही, हे सध्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकारावरून चालू असलेल्या गोंधळावरून दिसून येते.

भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव : कर्नाटकात २ रुग्ण आढळले ! – केंद्र सरकारची माहिती

भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. हे दोन्ही रुग्ण कर्नाटक राज्यातील आहेत.

ओमिक्रॉन व्हायरसविषयी अफवांवर विश्वास ठेवू नका ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

शंभूराज देसाई पुढे म्हणाले, ‘‘दक्षिण आफ्रिकेत या ओमिक्रॉन व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त ऐकायला मिळत आहे. यामुळे राज्यशासनाने तातडीने याविषयी उपाययोजना राबल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळा १५ डिसेंबरपासून चालू होणार ! – इक्बालसिंह चहल, मुंबई महापालिका आयुक्त

कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकारच्या पार्श्वभूमीवर चहल म्हणाले की, १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ सहस्र १२६ प्रवासी आतापर्यंत मुंबई विमानतळावर उतरले आहेत.

नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ विषाणूचे सावट !

साहित्य संमेलन आणि ‘ओमिक्रॉन’ विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली असून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कठोर निर्बंध घालण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्‍यांची कर्नाटक सीमेवर पडताळणी होणार ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

आता कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करतांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतलेले प्रमाणपत्र किंवा ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे.

संभाजीनगर येथे लस न घेतलेले कर्मचारी आढळल्यास संबंधित संस्थेला ५० सहस्र रुपयांचा दंड ! – सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून जिल्हाधिकार्‍यांनी काळजीच्या सूचना दिल्या आहेत, तसेच २० दिवसांपूर्वी परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती कळवण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

देशात कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकारचा एकही रुग्ण नाही ! – केंद्रीय आरोग्यमंत्री

देशात आतापर्यंत कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकारचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वांत प्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’च्या धोक्याला अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ला अनुसरून केंद्राच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या प्रकरणी विमानतळ, रेल्वे स्थानक आदींना सतर्क करण्यात आले आहे.

जगातील १३ देशांमधून येणार्‍या प्रवाशांचे सक्तीने विलगीकरण करण्यात येणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

दक्षिण आफ्रिकेतून येणार्‍या प्रवाशांची ७२ घंट्यांपूर्वीची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी नकारात्मक असणे बंधनकारक आहे. या प्रवाशांचे कठोरपणे स्क्रिनिंग आणि तपासणी करण्यात येईल.