Wildfire At Chamundi Hills : म्हैसुरू (कर्नाटक) येथील चामुंडी डोंगरावर आग : ३५ एकर जंगल नष्ट !

म्हैसुरू (कर्नाटक) – चामुंडी डोंगरावर नुकतीच आग लागली. या आगीत ३५ एकर जंगल नष्ट झाले, असे उपवनसंरक्षक बसवराज यांनी सांगितले. हे समाजकंटकांचे कृत्य असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सहा वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे आग लागून डोंगरावरील जंगल नष्ट झाले होते. वर्ष २०१७ मध्ये चामुंडी डोंगराच्या ललिताद्रपुरा गस्तीच्या परिसरात आग लागून ६ एकर क्षेत्राची हानी झाली होती. त्याचप्रमाणे वर्ष २०१९ मध्ये ७० एकर, तर वर्ष २०२२ मध्ये २ एकर परिसरात आग लागली होती.

चामुंडी डोंगरावर श्री चामुंडेश्‍वरी देवीचे मंदिर आहे, जी म्हैसुरूच्या महाराजांची कुलदेवता आहे. या डोंगराला आणि मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण ते अनेक शतकांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिले आहे.