केरळमध्ये भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू

येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला. मुन्नार येथून २५ किमी अंतरावर असणार्‍या भागात हे भूस्खलन झाले.

मुंबईतील अतीवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून आपद्ग्रस्तांना १० सहस्र रुपये द्या ! – भाजप

मुंबईतील अतीवृष्टीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपद्ग्रस्तांना १० सहस्र रुपयांचे साहाय्य करावे, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील विजयदुर्ग किल्‍ल्‍याची पडझड रोखण्‍यासाठी तातडीने अंदाजपत्रक सिद्ध करा !

सिंधुदुर्ग येथील देवगड तालुक्‍यातील विजयदुर्ग किल्‍ल्‍याची होणारी पडझड रोखण्‍यासाठी तात्‍काळ उपाययोजना करण्‍यात याव्‍यात, या मागणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय सांस्‍कृतिक मंत्री प्रल्‍हाद सिंह पटेल यांची भेट घेतली.

कोकण रेल्‍वेमार्गावर पेडणे (गोवा) येथे बोगद्यात दरड कोसळली

कोकण रेल्‍वेमार्गावर पेडणे (गोवा) येथील बोगद्यात दरड कोसळल्‍याने रेल्‍वेवाहतूक ठप्‍प झाली आहे. कोकण रेल्‍वेला यंदा पहिल्‍यांदाच अशा मोठ्या समस्‍येला सामोरे जावे लागले आहे. दरड हटवण्‍याचे काम रेल्‍वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर चालू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम

अरबी समुद्रात राज्याच्या उत्तरेस निर्माण झालेली ‘सायक्लोनिक सर्क्युुलेशन’ स्थिती दक्षिणेकडे सरकत असून, बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीत, तसेच जिल्ह्यात ६ ऑगस्ट या दिवशी अतीवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गोव्यात मुसळधार पावसामुळे डिचोली आणि सत्तरी तालुक्यांना पाण्याचा वेढा

राज्यात सतत दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राज्यातील काही नद्यांची पातळी धोकादायक स्थितीवर आलेली आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वार्‍यासह झालेल्या अतीवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करतांना महामार्गाची उंची वाढवल्याचा परिणाम अनेक ठिकाणी पूर येण्यात झाला आहे.

मुंबईमध्ये वादळी वार्‍यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबईमध्ये सलग दुसर्‍या दिवशी वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईच्या सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली, तसेच अनेक ठिकाणी वाहने पाण्यात अडकली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस : गावांतील जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे काही ठिकाणी पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली, तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्याने वीजप्रवाह खंडित झाला, तसेच गावांतील जनजीवन विस्कळीत झाले.

गोव्यात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

राज्यात गेल्या २४ घंट्यांत सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.