आपत्कालीन परिस्थितीत चेतावणी देणारे २० वर्षांपूर्वीचे भोंगे कालबाह्य !

स्वयंचलित भोंगा इशारा प्रणाली खरेदी करण्याचा राज्यशासनाचा निर्णय !

मुंबई – आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची चेतावणी देणारे भोंगे २० वर्षे जुने म्हणजेच कालबाह्य झाले आहेत. नवीन अद्ययावत् आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित स्वयंचलित भोंगा इशारा प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. भोंगे इशारा प्रणालीची चाचपणी करण्यासाठी ७ जणांची तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे.

नव्याने भोंगे बसवण्यासाठी भारत संचार निगम लि. आणि महानगर टेलिफोन निगम लि. यांच्याकडील तंत्रज्ञानाने विकसित केलेले स्वयंचलित भोंगे मध्यवर्ती नियंत्रण केंद्रामधून नियंत्रित करणारे उपकरण संचासह बसवण्यात यावेत, अशा सूचना देहली येथील नागरी संरक्षण महासंचालकांनी दिल्या आहेत.