कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या; म्हणून कांगारू असलेला केक कापला नाही ! – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे यांची अभिनंदनीय कृती ! सध्या सर्वत्र विविध माध्यमांतून धार्मिक भावना दुखावण्यात येत असतांना किती क्रिकेटपटू, अभिनेते, राजकारणी आदी अन्यांच्या भावनांचा सन्मान करतात ?

‘अ‍ॅमेझॉन’समवेतचे सर्व करार संपुष्टात आणा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची केंद्र सरकारकडे मागणी

हिंदुद्वेषी ‘अ‍ॅमेझॉन’ समवेतचे सर्व करार रहित करण्यास सरकारला का सांगावे लागते ? सरकारला ते समजत नाही का ?, असे प्रश्‍न हिंदूंना पडतात ! 

देहलीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट : ४ – ५ गाड्यांची हानी

राजधानी देहलीत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होणे अपेक्षित नाही !

सिंघू सीमेवर स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्ते यांच्यात संघर्ष !

तलवारी, लाठीकाठ्या आदी साहित्य घेऊन आंदोलन करणारे आणि प्रसंगी पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आंदोलनकर्त्यांना वठणीवर आणण्याचा आदेश सरकार पोलिसांना का देत नाही ?

सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारीला तपोभूमीला भेट देणार

सरसंघचालक मोहनजी भागवत सध्या गोवा दौर्‍यावर आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत ३१ जानेवारी या दिवशी कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमीला भेट देणार आहेत.

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील लिंगराज मंदिराजवळील उत्खननात १० व्या शतकातील मंदिराचा भाग सापडला !

लिंगराज मंदिराजवळ पुरातत्व विभागाकडून करण्यात येत असलेल्या उत्खननातून १० व्या शतकातील एका मंदिराचा भाग आढळून आला आहे. यात एक शिवलिंगही सापडले आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे की, पंचायतन पद्धतीने या मंदिराचा परिसर बनवण्यात आला आहे.

६० वर्षे गुहेत ध्यान साधना करणार्‍या ऋषिकेश येथील संतांकडून श्रीराममंदिरासाठी एक कोटी रुपये दान !

येथील ८३ वर्षीय स्वामी शंकर दास यांनी श्रीरामंदिरासाठी १ कोटी रुपयांचे दान दिले आहे. स्वामी शंकर दास हे जवळपास ६० वर्ष ऋषिकेश येथील गुहेमध्ये ध्यान साधना करत आहेत.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

मनसे ‘मराठा राजभाषा’ दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे.

राजौरी (जम्मू) येथे मंदिराजवळ स्फोट !

श्री कालकामाता मंदिराला लक्ष्य करून करण्यात आलेल्या स्फोटामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.