ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

धुळे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील देवपूर भागातील श्री एकवीरादेवी मंदिर आणि शिंदखेड तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी माता मंदिर येथे नवरात्रीनिमित्त ग्रंथ अन् सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन स्वामीनारायण मंदिराचे प.पू. आनंदजीवन स्वामीजी, भागवताचार्य राजीवजी झा महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन ११ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू राहील. तरी अधिकाधिक धर्मप्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी एकवीरादेवी मंदिराचे विश्वस्त श्री. सोमनाथ गुरव, हिंदुत्वनिष्ठ श्री. राजू महाराज, डॉ. संजीवजी सिंह, सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे, श्री. किशोर अग्रवाल आदी साधक उपस्थित होते.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !