हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ४ पोलीस ठाण्यांत तक्रारी !

  • ‘हिजबुल्ला’च्या प्रमुखाच्या समर्थनार्थ शिवजन्मभूमी जुन्नर येथे होर्डिंग्ज लावून मोर्चा काढल्याचे प्रकरण

  • सूत्रधारासह सर्व दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी

पुणे – इस्रायल आणि आतंकवादी संघटना हिजबुल्ला यांच्यात चालू असलेल्या युद्धात या संघटनेचा प्रमुख सय्यद हसन नसरूल्ला याला इस्रायलने ठार केले. हिजबुल्लाला अमेरिका आणि अन्य ६० देशांनी ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. असे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत अर्थात् जुन्नर गावात (जिल्हा पुणे) नसरूल्लाचे ‘मानवतेसाठी लढणारा शहीद’ असे लिहिलेले मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले. ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पवित्र दिवशी ‘काळा दिन’ साजरा करण्यासाठी मोर्चाही काढण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक संतप्त आहेत. या घटनेच्या विरुद्ध हिंदु राष्ट्र समन्वय सीमतीने ४ पोलीस ठाण्यांत तक्रारी केल्या आहेत.

मंचर पोलीस ठाण्यामध्ये जुन्नरच्या घटनेचा निषेध म्हणून तक्रार अर्ज पी.आय. श्री सुनिल बडगुजर यांना देण्यात आला.

१. ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पवित्र दिवशी ‘काळा दिन’ साजरा करण्यासाठी जुन्नर येथील मुसलमानांनी मोर्चाही काढला होता. त्यामुळे शिवप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक संतप्त आहेत.

२. ‘शिवछत्रपतींच्या शिवनेरी किल्ला असलेल्या जुन्नर जन्मगावी असे देशविघातक आणि देशद्रोही कृत्य करणार्‍या मुख्य सूत्रधाराला शोधून सर्व दोषींच्या विरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने केली आहे. या सदंर्भात महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तसेच तळेगाव, मंचर आणि कोल्हापूर शहरांतील पोलीस ठाण्यात तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत.

तक्रारीत म्हटले आहे की…,

१. जुन्नर येथील सय्यदवाडा येथे काही मुसलमानांकडून मोठे होर्डिंग लावून नसरूल्लाचे उदात्तीकरण करण्यात आले. यात इस्रायल आणि अमेरिका या भारताच्या मित्र देशांना आतंकवादी म्हणून संबोधण्यात आले आहे.

२. जुन्नर येथे नसरूल्ला याच्या समर्थनार्थ बॅनरबाजी कुणी आणि का केली ?, असे कृत्य करणार्‍याचा हेतू काय होता ?, त्यांना अर्थपुरवठा कुठून झाला ? ३ ऑक्टोबरला आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून घोषणाबाजी कुणी आणि का केली ? त्याची त्यांनी रितसर पोलीस अनुमती घेतली होती का ? आदी प्रश्‍न हिंदु राष्ट्र समन्वय समितीने तक्रारीमध्ये उपस्थित केले आहेत.

३. आतंकवादी कृत्यांचे उदात्तीकरण करून भारताच्या मित्र देशांविरुद्ध समाजात विष आणि द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने हे देशविघातक कृत्य केलेले आहे. या प्रकारचे कृत्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सान्निध्याने पावन झालेल्या जुन्नर येथे केलेले असून ते महाराष्ट्र आणि देशाच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे. नसरूल्लाला मानवतावादी संबोधून त्याचे उदात्तीकरण करणारे फलक लावले जातात, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद आहे. आता तरी पोलिसांनी याविषयी तातडीने कठोर कारवाई करावी.

संपादकीय भूमिका

राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांच्या विरुद्ध पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली पाहिजे !