पृथ्वीमातेचा भविष्यातील धूसर झालेला आणि धोक्यात आलेला प्रवास !
रस्त्यांवर अधिक प्रमाणात वाहने धावत आहेत, महासागर आणि जलमार्ग ओलांडून अधिक जहाजे जात आहेत, अधिक विमाने आकाशात उड्डाण करत आहेत. याउलट दुसरीकडे प्लास्टिक कचरा, ई-कचरा, हरितगृह वायू, तसेच गंजलेल्या धातूच्या ‘स्क्रॅप’च्या विळख्यात, दरम्यान निसर्गमाता गुदमरलेली, विखुरलेली आणि स्तब्ध झाली आहे…