वेळ निघून जात आहे ! जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कृती करावी !!

‘सत्तेच्या खेळातील खेळाडूंसाठी ती एक करमणूक असू शकते; इतरांचे विचार न स्वीकारणार्‍या विचारवंतांसाठी भारताच्या अब्जावधी वर्षांच्या जुन्या इतिहासातील हा केवळ एक टप्पा असू शकतो किंवा रस्त्यावरच्या अज्ञानी आनंदी माणसाने ‘माझे दुर्दैव’ यासारखे स्वतःवर केलेले दोषारोप असू शकतात; परंतु अशा वृत्तीचे आज व्यापलेल्या धोकादायक परिस्थितीविषयीचे परिणाम नक्कीच विनाशकारी असतील. जिहादी घटकांनी हिंदू आणि त्यांच्या देवतांवर केलेल्या विध्वंसक अन् प्राणघातक आक्रमणांच्या घटनांमध्ये अचानक झालेली वाढ, तसेच त्यानंतर हिंदु गटांकडून त्याला प्रत्युत्तर देणे, ही खरोखरच गंभीर अन् चिंतनीय आहे.


१. देशातील कायदा-सुव्यवस्थेविषयी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारी केंद्र आणि राज्य सरकारे

राज्यघटनेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेद्वारे पूर्णपणे सक्षम असलेल्या, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मूलभूत अधिकार असलेल्या; परंतु निराशाजनकपणे अपयशी ठरलेल्या काळातील सरकारांना संपूर्ण दोष देण्यास कुणीही संकोच करू नये. ‘कायदा-सुव्यवस्था राखण्याचा विषय राज्यांकडे आहे’, या विशाल याचिकेखाली केंद्र सरकारने राज्य सरकारांकडे उत्तरदायित्व सोपवण्याचा खेळ, म्हणजे दुसरे काही नसून स्वतःचे उत्तरदायित्व टाळण्यासाठी चतुराईने सिद्ध केलेले शस्त्र आहे. राज्यघटनेनुसार केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘सर्वशक्तीमान’ आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या खेळाला दोन्ही खेळाडूंनी उत्तरदायित्व असल्याच्या भावनेने पालटण्याची वेळ आली आहे.

अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय

२. सध्या धर्माच्या आधारावर झालेले हिंदु आणि मुसलमान समुदायांचे ध्रुवीकरण

आज जातीय हिंसाचारात अचानक झालेली वाढ पहाता हिंदु आणि मुसलमान समुदायांनी प्रत्यक्षात धर्माच्या आधारावर पूर्णपणे ध्रुवीकरण केले आहे, हे मान्य करण्यास आपण संकोच करू नये. ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’, या घोषणेचा भूतकाळातील ढोंगीपणा पूर्णपणे उघड झाला आहे. दोन्ही बाजू शब्दांची उधळपट्टी न करता त्यांच्या ठरवलेल्या घोषित उद्दिष्टांसाठी जोरदार प्रचार करत आहेत. तरीही उत्कटतेने विचारविनिमय करून हे प्रकरण सौहार्दपूर्णपणे सोडवले जाऊ शकते, असे म्हणण्यात काही लाभ नाही. तो टप्पा अनेक दशकांपूर्वी निघून गेला आहे. खरे तर त्यांच्या (मुसलमानांच्या) निवडून आलेल्या नेत्यांचा दुटप्पीपणा पाहून जे त्यांच्या राजकीय नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही कारणास्तव साध्य केले नाही, ते साध्य करण्याचा निर्धार आता लोक करत आहेत.

३. हिंदुत्वासाठी कार्य करणारे भाजपमधील काही नेते

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (बिहार) आणि भाजपचे भाग्यनगरमधील आक्रमक आमदार टी. राजा सिंह यांनी ‘हिंदु एकता यात्रा’ काढली, रामसेनेची स्थापना केली अन् त्यांनी हिंदु राष्ट्राची जोरदार, तसेच स्पष्ट मागणी केली.

४. नजिकच्या काळात भारतात गृहयुद्ध झाल्यास देशाच्या सार्वभौमत्वाला धोका !

दुसरीकडे मुसलमानांमधील कट्टर मुसलमानही लढाऊ योजना सिद्ध करण्यात तितकेच व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत समोरासमोर येणे निश्चित आहे. ते किती लवकर होईल, ही काही दिवसांची किंवा काही मासांची गोष्ट आहे. थोडक्यात नजीकच्या भविष्यात आपण दुसर्‍या स्वातंत्र्ययुद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि या वेळी शत्रू अंतर्गत असेल. आता बांगलादेश आणि चीन यांसह पाकिस्तानसारखे आतापर्यंतचे बाह्य शत्रू गृहयुद्धासारख्या या परिस्थितीचा अपलाभ घेऊन देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करू शकतात.

आशा आहे की, सत्ताधारी जलद आणि प्रभावीपणे कृती करतील अन् कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला लोखंडी चपलांखाली चिरडतील. ‘एक असे सरकार अस्तित्वात आहे की, जे त्यांच्या जीवनाचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे’, असा विश्वास यातून ते लोकांमध्ये निर्माण करतील.’

– अधिवक्ता (डॉ.) एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा. (२४.१०.२०२४)