धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजमनाला जागृत करणारी सनातनची ग्रंथमालिका !

सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !

लोकशाहीला जनहितकरी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ।

भ्रष्टाचारी हप्तेवाले पापचरण करूनी नरकात जाती ।
साधना करूनी धर्माचरण करण्या संतजन सांगती ॥
भ्रष्टशाही वशिलेशाही यांची अपकीर्ती सांगू किती ।
लोकशाहीला जनहितकारी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ॥

भारताला हिंदु राष्ट्र संबोधण्यास प्रारंभ करा ! – हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे

‘तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत. तसे शासन आपल्याकडे हवे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महाराष्ट्र्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरण्यास सांगणे

‘हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरली, तर चिरंतन स्थैर्य मिळेल’, असाच संदेश राज्यपाल महोदयांच्या भाषणातून व्यक्त झाला.

प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे महत्त्व आणि त्याचा प्रशिक्षणार्थींना झालेला लाभ !

अन्यत्र दिले जाणारे कराटे प्रशिक्षण कितीही चांगले असले, तरीही चार भिंतींच्या बाहेर त्या विद्यार्थ्यांचे कौशल्य, शौर्य आणि त्यांनी घेतलेले प्रशिक्षण यांचा राष्ट्र अन् धर्म यांसाठी उपयोग होतांना दिसून येत नाही.

करवीर तालुका महिला आघाडी आणि करवीर शिवसेना यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन ! 

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने करवीर तालुका महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवणार्‍या राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन प्रत्येक मातेने स्वत:च्या मुलाला राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध करावे आणि मुलावर संस्कार करावे. 

मकरसंक्रांत

हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी प्रति ८० वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १०.१.२०२१      

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !