जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार

प्रतिकात्मक छायाचित्र

जुन्नर – शहरातील माई मोहल्ला भागात पोलिसांनी १६ जुलैला पहाटे एका खोलीवर धाड घालून २७० किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेहान कुरेशी, अदनान बेपारी, आतिक कुरेशी यांना अटक केली आहे. ज्या खोलीत हे मांस सापडले ती खोली फुरकान बेपारी याच्या मालकीची असून त्याच्यावर यापूर्वीही गोवंशाशी संबंधित गुन्हे नोंद आहेत, तसेच मुजम्मिल कुरेशी, बिलाल कुरेशी, समीर कुरेशी आणि शरीन बेपारी या संशयितांवरही आधीचे गुन्हे नोंद असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. यापुढेही अशा प्रकारची अवैध कृत्ये करणार्‍यांवर कडक कारवाई चालू राहील, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

वारंवार गोहत्या आणि गोतस्करीचे गुन्हे नोंद होत असूनही हे धर्मांध उघडपणे पुन्हा तोच गुन्हा करण्याचे धाडस करतात. यावरून कायदा आणि पोलिसांचा धाक संपूर्णपणे नष्ट झाला आहे, हेच लक्षात येते.