हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर-महाराष्ट्र आणि विदर्भ स्तरावर ‘ऑनलाईन’ बलीदानदिन साजरा !
जळगाव, २४ मार्च (वार्ता.) – आजचे युवक चित्रपटातील अभिनेते आणि अभिनेत्री यांचा आदर्श घेतात. हिंदी चित्रपटसृष्टी मात्र कबीर सिंहसारख्या व्यसनाधीनता आणि चंगळवाद शिकवणार्या चित्रपटांची निर्मिती करत आहे. आज या देशाला व्यसनाधीन कबीर सिंहची नाही, तर राष्ट्रासाठी समर्पित कार्य करणारे भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांची आवश्यकता आहे, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांच्या बलीदानदिनानिमित्त आयोजित ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गाथा शौर्याची, क्रांतिकारकांच्या बलिदानाची !’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या श्लोकाने आणि प्रार्थना करून करण्यात आला. त्यानंतर समितीच्या कु. शबरी देशमुख यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. समितीच्या कु. श्रुती शिरसाट यांनी भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांचा जन्म, कुटुंब अन् त्यांच्यातील राष्ट्रभक्ती दर्शवणारे प्रसंग उपस्थितांना सांगितले. श्री. श्रेयस पिसोळकर यांनी साँडर्सचा वध आणि इंग्रजांचा संसदेतील बॉम्बहल्ला या ऐतिहासिक प्रसंगाविषयी सांगितले, तसेच युवकांनी राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात कृतीशील होण्याचा संदेश दिला. शेवटी भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांनी वापरलेल्या वस्तूंच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही दाखवण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमींनी ‘राष्ट्र आणि धर्मकार्यात प्रतिदिन सहभाग घेणार’, असे उत्स्फूर्त मनोगत व्यक्त केले. या वेळी पुष्कळ युवक-युवती उपस्थित होते.
क्षणचित्रे१. कार्यक्रम चालू असतांना काही ठिकाणी ध्वनीक्षेपक लावून युवक एकत्रितपणे ऐकत होते. २. मालेगाव येथील भगतसिंग ग्रूपच्या युवकांनी हा कार्यक्रम ऐकून -धर्म कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. ३. कार्यक्रमाला उपस्थित असणार्या युवकांना वक्त्यांनी ‘तुमचा आदर्श कोण आहे ?’, असे विचारल्यावर उत्साहाने सर्व राष्ट्रपुरुषांची नावे ‘चॅटबॉक्स’मध्ये पाठवली. |