हिंदवी स्वराज्य स्थापले अजरामर !

त्यांनी येऊन घालवले आमचे स्वातंत्र्य ।
मंदिरे, महालास, नावासह दिले पारतंत्र्य ॥ १ ॥

तेजोमहलचा केला ताजमहल ।
तरी आमचा देश मोठा जहाल ॥ २ ॥

जाळून, खोडून, मारून इतिहास
बदलणारे हे बच्चे ।
आणि आम्ही तो सांभाळणारे,
जपणारे सच्चे ॥ ३ ॥

त्यांनी वाढवावी संख्या हा त्यांचा गुणधर्म ।
आपण मात्र स्वस्थ बसून
पाळावा मानवता धर्म ॥ ४ ॥

त्यांनी आक्रमणे केली, जिंकले नाही कधीच ।
आम्ही लढलो; पण हरलो मात्र नेहमीच ॥ ५ ॥

बेटा बापाला, भाऊ भावाला हा त्यांचा इतिहास ।
एका पोशिंद्यासाठी लक्षावधी
सिद्ध प्राण देण्याला ॥ ६ ॥

त्यांची वंशावळी मोठी, पाळेमुळे होती खोलवर ।
तरी शिवाजी राजांनी हिंदवी
स्वराज्य स्थापले अजरामर ॥ ७ ॥

बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥ ८ ॥

इथे लक्ष, करोडोंमध्ये जगतात ।
करोडो मात्र लक्षामध्ये मरतात ॥ ९ ॥

इथे बारा जातीजमातींचा आहे पगडा ।
तरीही हा बेईमान (अल्पसंख्यांक) आहे,
कसा तगडा ? ॥ १० ॥

– श्री. राहुल विठ्ठल कोरपड, बी.ई. (रसायनशास्त्र), पनवेल, जिल्हा रायगड

(संदर्भ : ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २००९)