
नदीघाटांच्या ठिकाणी भित्तीचित्रे उभारा !
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे निर्देश

नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरातील विविध नदीघाटांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पहाणी केली. नदीघाटांच्या ठिकाणी भारतीय स्थापत्यकलेचा नमुना असलेली भित्तीचित्रे उभारावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. ‘प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होईल’, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रुग्णालयाच्या शौचालयात अर्भकाचा मृतदेह !

मुंबई – विलेपार्ले येथील महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील शौचालयात एका नवजात बालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणी अधिक चौकशी चालू आहे.
भरधाव दुचाकीवर धोकादायक प्रकार !
मीरा-भाईंदर – येथे ४ तरुणांनी एका भरधाव दुचाकीवर धोकादायक प्रकार (स्टंट) केले. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. सार्वजनिक रस्त्यावर असे प्रकार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई कधी करणार ? – संपादक)
झाड कोसळून चालक घायाळ

मुंबई – पवईतील आयआयटी मार्केट परिसरात मोठे झाड चारचाकी वाहनावर कोसळले. त्यामुळे गाडीची पुष्कळ हानी झाली. वाहनचालकाला अग्नीशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले असून तो किरकोळ घायाळ झाला. प्रशासनाकडून झाड हटवण्याचे काम चालू होते.
संपादकीय भूमिका : आणखी किती झाडे कोसळल्यावर प्रशासन जागे होणार ?
छेड काढणार्याला तरुणीकडून प्रत्युत्तर !
अकोला – येथे रेल्वेच्या डब्यात एका तरुणाने तरुणीची छेड काढली; मात्र तरुणीने घाबरून न जाता त्याला खडसावले. त्याच्या हातात बांगड्या घातल्या. त्याच्या ओठांवर लिपस्टिक (ओष्ठशलाका) आणि चेहर्यावर लाली लावली. या वेळी अन्य महिलांनीही तरुणीला पाठिंबा दिला.
संपादकीय भूमिका : अशा धाडसी तरुणी सर्वत्र हव्यात !
मीरा रोड येथे ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळून एकाचा मृत्यू

मीरा रोड – येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली. या घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. क्रेन बाजूच्या इमातरतीतील वाहनतळात कोसळल्याने तेथील अनेक चारचाकी गाड्यांचा चक्काचूर झाला.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !