अभिनेत्री कंगना राणावत यांचे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या मुक्तीच्या अभियानाला समर्थन !

सिनेसृष्टीतील किती हिंदु कलाकार हिंदु धर्मावरील आघाताच्या विरोधात आवाज उठवतात ?

छायाचित्र सौजन्य: रिपब्लीक वर्ल्ड डॉट कॉम

मुंबई –  मंदिरे केवळ पूजा करण्याची जागा नाही, तर ती प्राचीन ज्ञान, परंपरा, वारसा आणि कला यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. काही मंदिरे तर आजच्या आधुनिक धर्मांची स्थापनाही झाली नव्हती, त्याच्या सहस्रो वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. भारतीय मग तो  कुठल्याही धर्माचा किंवा तत्त्वज्ञान मानणारा असेल, ही मंदिरे त्याची आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांची वाईट स्थिती पाहून मी दुःखी आहे. आपल्या समृद्ध वारशाचे हे आपण काय केले आहे ? आपला देश, संस्कृती आणि वारसा यांच्या संवर्धनासाठी आपण उभे रहात नाही, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी तमिळनाडूतील मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी चळवळ हाती घेतली आहे. राणावत यांनी या चळवळीला समर्थन दिले आहे.