
बीड – जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ विद्यालयात गेल्या महिनाभरापासून नियमित अध्यापन पूर्णपणे बंद असल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी १६ जुलै या दिवशी शाळेच्या मैदानात उतरून ‘आम्हाला शिक्षण द्या, आमचे तास घ्या’, अशी घोषणा देत आंदोलन केले. विद्यालयात एकूण १६ शिक्षक कार्यरत असतांना आंदोलनाच्या दिवशी केवळ ८ शिक्षकच उपस्थित होते, तसेच शाळेत कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याने संपूर्ण प्रशासकीय कारभार विस्कळीत झाला आहे. शिक्षकांचे समायोजन आणि गेल्या ६ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. संस्थाचालक आणि प्रशासन यांच्या या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांनी शाळा आणि विद्यार्थी यांना वार्यावर सोडले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण