नरेंद्र मोदी १२ वर्षे पंतप्रधानपदी रहातील ! – महामंडलेश्‍वर स्वामी यतींद्र आनंद गिरि याचां ग्रह-नक्षत्रांच्या आधारे दावा

ते पुढे म्हणाले, मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान बनतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान बनून ‘हिंदु राष्ट्रवादा’चे स्वप्न पूर्ण करावे.

(म्हणे) ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्यास सिद्ध आहे; मात्र पंतप्रधान मोदी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आश्‍वासन द्यावे !’

दिग्दर्शक विनोद कापरी यांची मागणी !
दिग्दर्शक विनोद कापरी यांच्यासारख्या हिंदुद्वेषींच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !

माझ्या सांगण्यावरून खासदारांच्या मुलांना उमेदवारी नाकारली ! – पंतप्रधान मोदी यांची घराणेशाहीवर टीका

पक्षात घराणेशाही चालणार नाही. भाजपच्या नेत्याच्या आणि खासदाराच्या कुटुंबियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे. जर हे पाप असेल, तर ते मी केले आहे.

दडपलेले सत्य उघड झाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले गोंधळले आहेत ! – पंतप्रधान

‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, ते समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आज विरोध करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला तिन्ही सैन्यदलांच्या शस्त्रसज्जतेचा आढावा !

या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन्, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

‘द कश्मीर फाइल्स’चे निर्माता आणि दिग्दर्शक यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट !

याविषयी अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर या भेटीची छायाचित्रे प्रसारित करून लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी यांची भेट सुखद होती. त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’साठी काढलेले उत्साहवर्धक उद्गार आमच्यासाठी विशेष ठरले.

भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेचा विजय निश्‍चित केला आहे ! – पंतप्रधान मोदी

भाजपच्या विजयाने २०२४ चा संसदेतील भाजपचा विजय निश्‍चित केला आहे. योगी अदित्यनाथ हे भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, जे उत्तरप्रदेशात सलग दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

(म्हणे) ‘कट्टरतावादी हिंदु साधूची राजकीय शक्ती वाढली !’

हा ‘अल्-जजीरा’ वृत्तवाहिनीचा हिंदुद्वेष होय ! लोकनियुक्त नेत्याला अशा प्रकारे हीन लेखणे, हा लोकशाहीचा अवमान नव्हे का ? लोकशाहीप्रेमी याविषयी गप्प का ? अशा विद्वेषी वृत्तवाहिनीवर भारतात बंदीच घातली पाहिजे !

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्‍चर्य ते काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्याशी संवाद !

युक्रेनमध्ये १८ सहस्र पैकी ७०० ते ८०० विद्यार्थी अजूनही अडकलेले आहेत. युद्धबंदी झाली, तरच त्यांना तेथून बाहेर येता येणार आहे. त्यासाठीच भारत या दोन देशांशी पुनःपुन्हा बोलणी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे ते भारताचे ऐकून युद्धबंदी करत आहेत !