योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवतील पंतप्रधानपदाची धुरा !

महोबा (उत्तरप्रदेश) – ग्रह-नक्षत्रांनुसार नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी १२ वर्षे रहातील, अशी भविष्यवाणी महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केली.
महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी पुढे म्हटले आहे की, १२ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी देहलीच्या राजकारणापासून दूर जातील. पंतप्रधानपद त्यागतांना मोदी या पदाची धुरा राष्ट्रवादाच्या आधारावर देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवू शकणार्या व्यक्तीवर सोपवतील. या माध्यमातून मोदी सर्वांसमोर आदर्श ठेवतील. यामधून राजकीय इतिहास घडेल.
मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान बनतील !

महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि पुढे म्हणाले, मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान बनतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान बनून ‘हिंदु राष्ट्रवादा’चे स्वप्न पूर्ण करावे.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’