भारताने युक्रेनमधून सुखरुप बाहेर काढल्याने पाकिस्तानी तरुणीने मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार !

पाक धर्माच्या नावावर प्रतिदिन तेथील निष्पाप अल्पसंख्य हिंदूंची हत्या करतो, तर भारत मानवतेच्या भूमिकेतून पाकच्या नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतो ! तरीही तथाकथित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भारतालाच ‘असहिष्णु’ ठरवातात !

अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी खंडणी वसूल करत आहेत ! – संजय राऊत, शिवसेना, खासदार

अंमलबजावणी संचालनालयाचे मोठे अधिकारी भाजपचे ए.टी.एम्. मशीन बनले असून काही अधिकारी खंडणी वसूल करत आहेत, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी ३५ मिनिटे साधला संवाद !

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या साहाय्यासाठी झेलेंस्की यांचे आभार मानले.

आपण कितीही श्रीमंत असलो, तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ६ मार्च या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या २ शहरांतील पिंपरी ते फुगेवाडी अन् गरवारे स्थानक ते आनंदनगर या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एम्.आय.टी. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेच्या वेळी ते बोलत होते.

भारताने रशियाला युद्ध थांबवायला सांगावे ! – युक्रेनची पंतप्रधान मोदी यांना विनंती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘युद्ध कोणत्याही देशाच्या हिताचे नाही’, असे समजावून सांगा, अशी मागणी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !

रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते.

अमेरिका भारताशी वाढत्या मैत्रीसाठी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता यांची आभारी आहे ! – अमेरिका

भारताने रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात तटस्थ भूमिका घेतल्यानंतरही अशा प्रकारचे विधान अमेरिकेच्या खासदाराकडून करणे महत्त्वाचे मानले जात आहे.

‘योगी मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणार्‍या हिंदूवर धर्मांधांचे जीवघेणे आक्रमण !

धर्मांधांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रती किती द्वेष आहे, हेच यातून दिसून येते ! अशांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक !

मोगलांनी राजपूतांचा नरसंहार केला, तसा रशिया आमचा करत आहे ! – युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा  

रशियाने युक्रेनच्या विरोधात छेडलेले युद्ध हे भारतात मोगलांनी राजपूतांच्या विरोधात घडवलेल्या नरसंहारासारखे आहे, असे विधान युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी केले.

विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाणार !

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी ४ केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला.