पंतप्रधान मोदी यांना देहू (जिल्हा पुणे) येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे वारकरी संप्रदायाकडून आमंत्रण !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

पंतप्रधान मोदी यांच्या जीवनातील प्रसंगांचे कथन करणार्‍या संकेतस्थळाचे अनावरण !

असेच प्रसंग कुणाच्या जीवनात घडले असल्यास त्यांनीही याची माहिती पाठवावी, असे आवाहनही या संकेतस्थळाने केले आहे. काही स्वयंसेवकांच्या पुढाकाराने हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे.

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारताने प्रथमच एका वर्षात केली ४०० बिलियन डॉलर्सची निर्यात !

‘आत्मनिर्भर भारता’च्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बळावर आर्थिक वर्ष २०२१-२२ संपायच्या ९ दिवस आधीच भारताने ४०० बिलियन डॉलर्सची (३० सहस्र ५४० कोटी रुपयांहून अधिक रकमेची) निर्यात केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाने भारताला परत दिल्या भगवान विष्णु, शिव आणि जैन पंथ यांच्या चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती !

देवतांच्या प्राचीन मूर्ती चोरीला जाऊ नयेत, यासाठी सरकार आतातरी ठोस पावले उचलणार का ?

इस्रायली पंतप्रधान बेनेट यांचा एप्रिलमध्ये भारत दौरा !

पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे पालटत असलेली भूराजकीय समीकरणे, तसेच उभय देशांमधील संबंधांना नव्या स्तरांवर घेऊन जाण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलणे, हा या दौर्‍याचा उद्देश असेल.

जपानच्या पंतप्रधानांची भारत भेट देशाच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरेल !

‘जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत. कोरोनाचा काळ निवळल्यानंतर एका मोठ्या राष्ट्रप्रमुखाने भारताला दिलेली ही पहिली भेट आहे. जपानच्या पंतप्रधानांसाठीही ही भेट महत्त्वाची आहे.

जपान रशियावर प्रतिबंध घालण्यासाठी भारतावर दबाव टाकवणार !

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे भारताच्या दौर्‍यावर आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

योगी आदित्यनाथ हे हिंदु राष्ट्रातील प्रथम पंतप्रधान असतील !

मुख्यमंत्रीपदाच्या मागील कार्यकाळात त्यांच्यावर कोणताही डाग नाही. त्यांनी ज्याप्रकारे काम केले आहे, त्यावरून येणार्‍या काळात ते देशाची सूत्रे सांभाळतील, हे लक्षात येते. ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार आहेत आणि एक दिवस देशाचे पंतप्रधान बनतील, असे भविष्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

… ही लोकचळवळ व्हावी !

यातील देशविरोधी पात्राच्या तोंडी पुढील संवाद आहे, ‘देशातील शासन भले त्यांचे असले, तरी व्यवस्था ‘आमची’ आहे.’ इथेच सगळ्याचे मूळ आहे. ‘सध्याची प्रचलित आणि हिंदूंवरील अन्याय्य व्यवस्था दूर करणारी दुसरी सक्षम व्यवस्था निर्माण होणे’ हा सर्वंकष उपाय आहे’, हेच यावरून सिद्ध होते. ती व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रच देऊ शकते !