‘आरक्षणमुक्त भारत’ हीच शाहू महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

पनवेल (जिल्हा रायगड) येथील राणा सभागृहात नथुराम सेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या २५ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका

गोमाता आणि गोवंश यांचे रक्षण करणार्‍या पोलिसांचे अभिनंदन ! राज्यात गोवंशियांच्या कत्तलीच्या वारंवार होणार्‍या घटना रोखण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

कोरोनाबाधित ठरवण्यासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ग्राह्य

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तिसर्‍या स्तरामध्ये समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.

मुंबईतील २ सहस्रांहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची राज्य सरकारची न्यायालयात माहिती

कोरोनावरील बनावट लसीकरणाचे प्रकरण, नागरिकांच्या शरिरात प्रतिपिंडे निर्माण झाली का ? याची पडताळणी करण्याचा न्यायालयाचा आदेश

उत्तरप्रदेशमधील धर्मांतराचा संबंध आतंकवादाशी आणि देशव्यापी असल्याने त्याचे अन्वेषण ‘एन्.आय.ए.’कडे सोपवा !

नुकतेच उत्तरप्रदेशातील १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या २ मौलानांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा होत असल्याचे चौकशीत पुढे आले,..

टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दुसर्‍यांदा आरोपपत्र प्रविष्ट !

‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’ (टीआरपी ) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टी.व्ही.चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर २२ जून या दिवशी दुसरे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.

शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे !

हिंदूंची देवस्थाने भक्तांकडे नव्हेत, तर राजकीय पक्षांच्या कह्यात देणे, हा हिंदु धर्मावरील घोर अन्याय होय. केवळ आर्थिक उत्पन्न देणारी मंदिरे कह्यात घेऊन दूरवस्था झालेल्या मंदिरांकडे दुर्लक्ष करणे, हा तुघलकी प्रकारच आहे

कल्याण येथे ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा १ कोटी २ लाख ६२ सहस्र रुपये किंमतीचा साठा जप्त !

तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणार्‍या एल्.एस्.डी. पेपर अर्थात् ‘पेपर बॉम्ब’ या नशायुक्त पदार्थाचा (ड्रग्स) साठा ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पकडण्यात आला आहे.

राज्यातील आशासेविकांचा संप अखेर मागे !

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत आशासेविकांच्या कृती समितीच्या झालेल्या बैठकीनंतर राज्यातील आशासेविकांनी घोषित केलेला संप मागे घेतला आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचखोर साहाय्यक भूसंपादन अधिकारी आणि अव्वल कारकून कह्यात !

तक्रारदारांचे घर विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणात संपादित केले असून त्याचा मोबदला म्हणून ६ लाख ३६ सहस्र रुपये संमत झाले आहेत. ही रक्कम मिळवून दिली;..