टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दुसर्‍यांदा आरोपपत्र प्रविष्ट !

अर्णब गोस्वामी यांसह अन्य ६ जणांचा समावेश

अर्णब गोस्वामी

मुंबई – ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’ (टीआरपी ) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टी.व्ही.चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर २२ जून या दिवशी दुसरे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या आरोपपत्रात गोस्वामी यांसह अन्य ६ जणांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना दोषी ठरवले असून यामध्ये ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (बीएआर्सी) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थाे दासगुप्ता यांचाही समावेश आहे.

२४ मार्च या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना या प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले होते. ऑक्टोबर २०२० मध्ये टीआरपी घोटाळा उघडकीस आला होता. ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’कडून ‘हंसा रिसर्च ग्रुप’द्वारे याविषयी तक्रार करण्यात आली होती. काही ‘टी.व्ही. चॅनेल्स’ पैसे देऊन ‘टीआर्पी’ वाढवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.