नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या २५ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका

एका धर्मांधाला अटक 

गोमाता आणि गोवंश यांचे रक्षण करणार्‍या पोलिसांचे अभिनंदन ! राज्यात गोवंशियांच्या कत्तलीच्या वारंवार होणार्‍या घटना रोखण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

मुंबई, २७ जून (वार्ता.) – नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील सोपारा गावातील वाझा मोहल्ला, हड्डी मैदान येथे अवैध वाहतूक रोखून पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या २५ गोवंशियांची सुटका केली. यामध्ये गोमाता आणि वासरे यांचा समावेश होता. पोलिसांनी ही कारवाई २४ जून या दिवशी सकाळी ११.४५ वाजता केली असून या प्रकरणी टेम्पोचालक सद्दाम महंमद रफिक शहा याला अटक करण्यात आली आहे.

या वेळी पोलिसांनी अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो कह्यात घेतला आहे. सुटका करण्यात आलेले गोधन आणि वाहन यांचे मूल्य १२ लाख ५९ सहस्र ९०० रुपये इतके आहे. कह्यात घेतलेल्या गोवंशियांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे आणि त्यांचे सहकारी यांनी केली.